छळछावणीसोबत हसत सेल्फी काढले, बॉक्सरला नेटकऱ्यांनी झोडपलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑश्ट्विझ येथील नाझींच्या छळछावणीसोबत हसत सेल्फी घेणाऱ्या एका बॉक्सरला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. हा खेळाडू माजी विश्वविजेता आहे.

या खेळाडूचं नाव जेमी मॅक्डोनाल्ड असं आहे. तो त्याच्या प्रेयसीसोबत पोलंड येथे गेला होता. त्यावेळी त्यांनी ऑश्ट्विझ येथील छळछावणीला भेट दिली. जेमी आणि त्याच्या प्रेयसीने छळछावणीच्या परिसरात फोटो काढले. त्यातले जवळपास सर्व फोटो हे सेल्फी प्रकारचे आणि हसत असतानाचे होते.

ते फोटो जेमीने सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्याखाली ऑश्ट्विझ परिसरात एक सुंदर सहल जी तुमचे डोळे उघडतेस अशी कॅप्शनही त्याने दिली. त्या फोटोंना पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला. त्यांनी जेमीला फटकारायला सुरुवात केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ज्यूंच्या हत्या करण्यासाठी या छळछावणीची स्थापना करण्यात आली होती. या छळछावणीत हजारो ज्यूंचं अतिशय निर्घृण आणि अमानवीय पद्धतीचं हत्याकांड घडलं. त्यामुळे हे ठिकाण ज्यूंचं स्मारक आणि नाझींच्या छळाचं प्रतीक मानलं जातं.

अशा ठिकाणी हसून सेल्फी घेणं हे अतिशय असंवेदनशील मनाचं लक्षण असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं पडलं. इथे असे फोटो घ्यायला हे डिस्नेलँड नाही, अशा शब्दात नेटकऱ्यांनी जेमीचा समाचार घेतला. अखेर जेमीला ते फोटो डिलीट करावे लागले.