सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ जाहीर, शुभम शिंदेकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kabaddi-india
फाईल फोटो

उत्तर प्रदेशमधील अयोध्य येथे 13 ते 16 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीच्या शुभम शिंदे याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्राच्या संघात मुंबई शहरच्या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पंकज मोहिते व सुशांत सैल ही त्यांची नावे. तसेच मुंबई उपनगरचा रिशांक देवाडिगा हादेखील महाराष्ट्राच्या संघात आहे. विकास काळे, ऋतुराज कोरवी व संकेत सावंत यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून देण्यात आली.

महाराष्ट्राचा संघ खालीलप्रमाणे

रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक, शुभम शिंदे, सिद्धार्थ देसाई, नीलेश साळुंखे, दादासो अवाड, सुनील दुबीळे, सुशांत सैल, अजिंक्य पवार, पंकज मोहिते, मयूर कदम, सुधाकर कदम.

व्यवस्थापक – बजरंग परदेशी.
प्रशिक्षक – प्रशांत सुर्वे.