
हनुमान चालिसा पठण प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा फटकारले. पुढील सुनावणीवेळी हजर राहणार असल्याची लेखी हमी द्या, अन्यथा आम्ही आदेश काढू, अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली. त्यावर राणा दांपत्याच्या वतीने वकिलांनी लेखी हमी दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 30 मेपर्यंत तहकूब केली.


























































