जेरुसलेमच्या सिनेगॉगमध्ये दहशतवादी हल्ला, 7 जणांचा मृत्यू

जेरुसलेममधल्या सिनेगॉगमध्ये पॅलेस्टीनी दहशतवाद्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जेरुसलेमच्या पूर्वेकडे असलेल्या नेवे याकोव भागातील सिनेगॉगमध्ये हा हल्ला झाला आहे. हल्लेखोर हा देखील देरुसलेमचाच रहिवासी असल्याचे कळाले आहे. गेल्या काही वर्षातला हा भीषण दहशतवादी हल्ला असल्याचे पोलीस आयुक्त कोबी शाबताई यांनी सांगितले आहे.

शब्बाथसाठी ज्यू लोकं सिनेगॉगमध्ये एकटवटली होती. प्रार्थना संपवून घरी निघत असताना हल्लेखोर सिनेगॉगमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरू केला. या घटनेमुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालं होते. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दहशतवाद्याचा खात्मा केला. पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची कार मिळाली असून ती हल्लेखोराचीच असावी असा पोलिसांना संशय आहे. पॅलेस्टाईनच्या दहशतवादी गटांनी या हल्ल्याचं स्वागत केलं असलं तर त्यांच्यापैकी कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ला झाल्यानंतर पॅलेस्टाईनमध्ये मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. वेस्ट बँक आणि गाझापट्टीमध्ये हल्ल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी रॅली काढण्यात आल्या होत्या.