खडकीत सशस्त्र टोळक्याचा राडा; सात जणांना अटक

पुणे शहरातील खडकी परिसरात सशस्त्र टोळक्याने हातात कुऱ्हाडी, तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर वार केल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

शुभम आगलावे (वय 19), दीपक आगलावे (वय 18), अनिकेत चांदणे (वय 19), व्यंकटेश मुदलियार (वय 20), शरद तायडे (वय 20), कपिल भोसले (वय 19) व रोहित लांडगे (वय 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी समीर अकबर पटेल (वय 20) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार मधील दुर्गा वसाहतीत मित्राशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या 8 ते 9 जणांच्या सशस्त्र टोळक्याने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

नागरिक पळापळ करत असताना समीर मित्रांसोबत त्याठिकाणी उभे राहिले होते. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने समीरला आम्हाला पाहून पळत का नाही असे, विचारत मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने समीरचा पाठलाग करुन त्याच्यावर वार केले. याप्रकरणी 7 जणांना अचक करण्यात आली असून खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या