थाई बॉक्सिंग महापौर चषक स्पर्धेत शीवच्या रॉयल स्पोर्टस्ने मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रिडा प्रतिनिधी । मुंबई

धारावी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे आयोजित ‘थाई बॉक्सिंग’ संलग्न महानगरपालिका महापौर चषक स्पर्धेत शीवच्या रॉयल स्पोर्टस् अकादमीने बाजी मारली आहे. या स्पर्धेत ऍकॅडमीमधील खेळाडूंनी ३ सुवर्ण, ५ रौप्य तर ३ कास्य पदकांवर नाव कोरले आहे.

रॉयल स्पोर्टस्चे संस्थापक मास्टर आकाश शिंदे यांच्या रॉयल स्पोर्टस् अकादमीमधून धारावी, शीव, ऍन्टॉप हिल, वडाळा तसेच मनपा शाळेतील गोजिरीआ स्टाइलच्या मुलामुलींनी सहभाग घेतला. यात पदके मिळविलेल्या विजेत्या स्पर्धकांची यादी पुढीलप्रमाणे –
ग्रॅण्डमास्टर संदेश थिटे, मास्टर सचिन शिंदे, रॉयल स्पोर्टस् कोच मास्टर विशाल कदम, मास्टर शंतनू जाधव, मनपा शिक्षिका माधवी पोकळे, मास्टर जयेश कदम, मास्टर प्रसाद कांबळे, मास्टर प्रतीक मोहिते यांनी खेळाडूंसाठी मेहनत घेतली.

सुवर्ण पदक विजेते
आशीष निकाळजे, दीपाली बाबर, सिमरन मंडल

रौप्य पदक विजेते
महेश सोळंकी, अनिकेत, रेश्मा शेख, दीक्षा पवार, भावेश पवार

कास्य पदक विजेते
वैष्णवी रेडीज, मयूर दिलावर, महेश गव्हाणे