अभिनेता करण ओबेरॉयला हायकोर्टाचा दिलासा,जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

लैंगिक अत्याचारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता करण ओबेरॉय याला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी करणचा जामीन अर्ज मंजूर केला. हा जामीन अर्ज मंजूर करतानाच तपास अधिकारी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवतील तेव्हा हजर राहावे ही अटही न्यायमूर्तींनी घातली.

अभिनेता करणची 2016 साली सोशल मीडियावर एका महिलेसोबत मैत्री झाली. एक दिवस करणने भेटण्यासाठी तिला घरी बोलावले व लग्नाचे वचन दिले. यादरम्यान नारळपाणी पिण्यास दिल्यानंतर थोडय़ाच वेळात आपणास चक्कर आली. त्याचा फायदा घेत आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची पीडित महिलेने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी करणला 5 मे रोजी अटक केली. सुटकेसाठी करणने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला, मात्र तो अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावल्याने करणने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला.