आगळावेगळा शिमगा! एकमेकांच्या अंगावर फेकतात जळकी लाकडं

>>दुर्गेश आखाडे

शिमगा हा कोकणातला मोठा सण. कोकणात शिमगा विविध पद्धतीने साजरा केला जातो. अशीच एक आगळी-वेगळी पद्धत आहे ती सावर्डे येथे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील व्होल्टे होम प्रसिद्ध आहेत. होळीतील जळकी लाकडं म्हणजेच व्होल्टे एकमेकांवर फेकले जातात. हा व्होल्टे होम पहाणे नेत्रदीपक क्षण असतो.

n सावर्डे येथील केदारनाथ ग्रामदैवताला साक्ष ठेवून शिमगा साजरा केला जातो. सावर्डे येथे नवव्या दिवशी हे व्होल्टे होम खेळले जातात. ज्या व्यक्तीला व्होल्टे होम खेळायचे आहेत ती व्यक्ती आदल्या दिवशी उपवास धरते. हे व्होल्टे एकामेकांवर फेकले जातात.

असा असतो व्होल्टा होम

खोत आणि मानकरी असे दोन विभाग करतात. एका खुल्या मैदानात एका बाजूला खोत आणि दुसऱया बाजूला मानकरी उभे रहातात. नऊ दिवस पेटवलेल्या होळीतील अर्धी जळलेली लाकडं घेऊन येतात. ती लाकडं एकत्र करून पुन्हा पेटवतात. अर्धी जळालेली लाकडे म्हणजे व्होल्टे हातात घेतात. हे व्होल्टे एकमेकांच्या अंगावर फेकले जातात. हा शिमगा पहाण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून मंडळी सावर्डेत येतात.