‘मिंधे सरकार’ पुन्हा दिल्ली दरबारी, केंद्रीय गृहमंत्री शहांसोबत बैठक; ‘सहकारा’वर चर्चेची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिंदे-फडणवीस हे दिल्ली पोहोचल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात त्यांची एक बैठक सुरू आहे. अमित शहा यांच्यकडे केंद्रीय सहकार मंत्रीपदही आहे. त्यामुळे याबैठकीत सहकार क्षेत्रासंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सोबतच राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ, राज्यातील राजकारण यावर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीस खासदार रावसाहेब दानवे, राज्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अनेकदा दिल्लीत जातात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.