
सामना ऑनलाईन । मुंबई
शिर्डीच्या साईबाबा संस्थांजवळ देणगी देऊन जमा होणाऱ्या पैशांमधून राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांना अनुदान देण्याचं ठरविलं आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सोईसुविधा व रुग्णांना योग्य उपचार मिळावे म्हणून शिर्डीच्या साई बाबा ट्रस्टनं या करता पुढाकार घेतला आहे.
साई मंदिराचे संस्थापक अधिकारी व भाजपचे वरिष्ठ नेते सुरेश हावरे यांनी ७१ कोटी रुपयांचा निधी यवतमाळ, चंद्रपूर, संभाजीनगर व नागपूरातील वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच या ग्रामीण विभागातील वैद्यकीय महाविद्यालयात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन एमआरआई, सिटीस् स्कॅन व डिएसऐ या मशिन्स महाविद्यालयात उपलब्ध करुन देणार आहेत. हावरे यांनी पुढं असही सांगितलं की, १३ कोटी यवतमाळ, ३५.३ कोटी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, १६ कोटी संभाजीनगर व ७.५ कोटी चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयाला निधी देण्यााचे मंजूर झालेआहे. मंदिराच्या संस्थेने २१०० कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवली आहे. तसचं मंदिरच्या संस्थेचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटी एवढे आहे. तसचं दररोजच्या देणग्यांमधून २ कोटी रुपये जमा होतात.त्यातील १ कोटी रुपये देणगी व भक्तांच्या राहण्याखाण्याचा सोई करता दिले जातात.
मंदिराच्या संस्थापक वरिष्ठ प्रशासकांनी सरकारी रुग्णालय चालू करण्याकरता खूप कालावधी लागू शकतो असं स्पष्ट केलं आहे.तसचं जरी आम्ही काही गंभीर आर्थिक स्थितीतून जात असलो तरीही आम्ही गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊ असं ही ट्रस्टच्या वरिष्ठ प्रशासकांनी सांगितलं आहे.


























































