
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर थोरलीवाडी पाटीजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात शिरूर ताजबंद येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मेघवर्धन उर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय 25) व रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय 24) अशी मृतांची नावे आहेत.
मेघवर्धन आणि रामेश्वर हे दोघे तरुण दुचाकीवरून जात असताना महामार्गावर स्विफ्ट कारशी दुचाकीची धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस निरिक्षक लाकाळ, पो. जमादार साळवे, पो.हे. कॉ. व्ही. बी. दिंडगे दाखल झाले. त्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































