शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा – अनिल राठोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जेव्हा जेव्हा महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली आहे, तेव्हा तेव्हा नगर शहरामध्ये विकासास मोठी चालना मिळाली आहे. नगर शहराबरोबरच सावेडी उपनगर भागाकडे विशेष लक्ष देऊन उपनगरांचा विकास साधला आहे. शिवसेनेच्या झालेल्या प्रत्येक महापौरांनी सावेडी उपनगरसाठी सर्वात जास्त निधी दिला आहे. त्यामुळे मतदारांनी आता आपल्या भागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास व्यक्त करुन प्रभाग 5 मधील सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करुन शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकविण्यास हातभार लावावा, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

प्रभाग 5 मधील शिवसेनेचे उमेदवार नगरसेविका विणा बोज्जा, कलावती शेळके, जयंत येलूलकर, पराग गुंड यांच्या प्रचाराचा शुभारंभ उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते प्रोफेसर कॉलनी चौकात झाला. यावेळी हिंद सेवा मंडळाचे प्रा.शिरिष मोडक, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अशोक सरनाईक, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, राजेंद्र सहस्त्रबुद्धे, गंगा बिटला, जगन्नाथ गुंड, अशोक काळभोर, विजय लाड, रघुनाथ झिने, श्रीनिवास बोज्जा, काका शेळके आदिंसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ
नगर : शिवसेनेने नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मनपात शिवसेनेच्या काळात शहरातील विविध विकास कामांना चालना मिळाली आहे. त्यामुळे शहरात अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या चांगल्या कामांमुळेच जनताही त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी चांगले वातावरण असून, नागरिक हे शिवसेनेच्या पाठीशी आहेत. प्रभाग क्र.9 मधील शिवसेनेचे उमेदवार हे जनतेच्या कायम संपर्कात राहणारे उमेदवार आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देतील, असा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला.

ward-9

प्रभाग क्र.9 मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारफेरीचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार सुरेश तिवारी, गौरव ढोणे, कविता दहिफळे, जयश्री सोनवणे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा भागातून प्रचारफेरी काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही प्रचारफेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.