फडणवीसांना संजय राऊत यांनी कडक शब्दात फटकारलं, म्हणजे महाराजांबद्दलचं तुमचं प्रेम…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. अत्यंत आक्रमक होत त्यांनी भाजपचं महाराष्ट्र आणि छत्रपती महाराजांच्या संदर्भातील प्रेम किती खोटं आहे हे सगळ्यांसमोर मांडलं.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतर कोणी काही बोललं असतं तर एव्हाना तुम्ही थयथयाट केला असता. मात्र आता तुमचे (भाजप) राज्यपाल आणि प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमान करणारी वक्तव्य करतात ऑन रेकॉर्ड आहे ते आणि तुम्ही बचाव करतायेत, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही’, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीस यांना फटकारलं.

वादग्रस्त विधान केल्यानंतर दोन दिवस उलटले तरी राज्यपाल किंवा भाजप प्रवक्त्याने माफी मागितलेली नाही यासंदर्भात विचारले असता महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.