सुकन्या समृद्धी योजना घरोघरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलींच्या भविष्यासाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजने’चे काम सुरू झाले आहे. ही योजना घरोघरी पोहचावी यासाठी शिवसेनेतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

दहिसर येथे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या वतीने या योजनेतंर्गत 125 मुलींचे बचत खाते उघडण्यात आले. यावेळी माजी महापौर शुभा राऊळ, युवा सेना समन्वयक ऋषिकेश ब्रीद, नगरसेविका शीतल म्हात्रे, संजना घाडी, उपविभागप्रमुख सुनील डहाळे आदी उपस्थित होते.

माझगावमध्ये नगरसेविका सोनम जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 210 मधील 10 वर्षांखालील मुलींकरिता खाते उघडण्यात आले. बचत खाते पुस्तिकेचे यावेळी वाटप करण्यात आले.