शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या… अरविंद सावंत यांचा मिंधे गटावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी एक पोस्ट शेअर करत शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली आहे. या पोस्टमधूनच शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या मिंधे गटावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…करण्या अवतार कार्य चंद्र सूर्य ताऱ्यांनो, वादळी वाऱ्यांनो, महाराष्ट्राभिमानी राष्ट्राभिमानी सैनिकांनो, व्हा प्रतिबद्द, घ्या शपथ. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अवमानीत करणाऱ्यांना, डॉ. बाबासाहेबांच्या संविधांनावर हल्ले करणाऱ्या मतीभ्रष्टांना, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना, राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना, प्रबोधनकार आणि  वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचार, आचारांचा खरा वारसा जपण्या, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान जपण्या. राष्ट्रधर्म सोडून जातीपाती , प्रांती, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या या राष्ट्र आणि महाराष्ट्रद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्या, उचला बेल भंडार ! म्हणा, उदो उदो ग अंबाबाई साहेब हीच आमची आपणास ग्वाही…!!! असे ट्विट अरविंद सावंत यांनी केले आहे.