
महाराष्ट्रात आज राज्यसभेसाठी निवडणूक पार पडली. भाजपने सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड व यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूकीची मतमोजणी रखडली आहे. त्यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला बोल केला आहे. ”ईडी चा डाव फसला! आता भाजपचा रडीचा डाव सुरू झाला”, असे ट्विट करत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे?
ईडी चा डाव फसला!
आता रडीचा डाव सुरू झाला!!
आम्हीच जिंकू!
जय महाराष्ट्र!!@BJP4Maharashtra@CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
भाजपवर हल्लाबोल करतानाच त्यांनी आम्हीच जिंकू असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. ”राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
भाजपचा हाच रडीचा डाव महाराष्ट्रासोबतच हरयाणामध्ये देखील सुरू आहे. त्यावरून काँग्रेस नेते अजय माकन यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. ”राज्यसभा निवडणूकीत हरण्याच्या भीतीने भाजप मतमोजणीच्या वेळी हरयाणात खूप खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे. मी या ट्विटसोबत भाजपचा आक्षेप फेटाळून लावणाऱ्या अधिकाऱ्याचे पत्र जोडले आहे. त्याकडे लक्ष द्या. खरच हिंदुस्थानात लोकशाही जिवंत राहिली आहे का?”, असे ट्विट माकन यांनी केले आहे.
Fearing the loss of face in Rajya Sabha election results-the BJP has resorted to cheap politics stalling counting of votes in Haryana.
Please have a look at the Returning Officer’s decision rejecting the BJP’s objections 👇
Is democracy still alive in India? pic.twitter.com/tTltgNkWJN
— Ajay Maken (@ajaymaken) June 10, 2022
संजय राऊत यांनी अजय माकन यांचे ट्विट रिट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात देखील हाच खेळ सुरू आहे. अत्यंत घटिया राजकारण”, अशा शब्दाल संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे.
महाराष्ट्र में यही खेल चल रहा है..
घटिया पॉलिटिक्स! https://t.co/ZbZa9orcW9— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022

























































