राजकीय भांडवल करण्यासाठी पीडितांच्या केसेसचा वापर नको- डॉ नीलम गोऱ्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीडित स्त्रीने आधार केंद्राने पीडितेला पोलिसांकडून हवी ती मदत करण्यासाठी सहकार्य केले आहे. न्यायदेवता तिचे काम करत राहील, त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. पीडितेला जर कोणी दबाव आणत असेल तर त्यांची चौकशी होईलच, अशी माहिती शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

अनेकदा पीडितेच्या जबाबंमध्ये विसंगती येऊ शकते पण त्या महिलेला योग्य प्रकारचे समुपदेशन मिळाले तर मानसिक स्थैर्य मिळण्यासाठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.

अनेक प्रकरणात पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा विरोधी पक्षांनी सुरू केली की काय अशी शंका येत आहे. कारण मुख्यमंत्री देखील म्हणाले होते की, आरोपही तुम्हीच करणार आणि पुरावेही तुम्हीच देणार, असेही त्या म्हणाल्या.

याबाबत असलेले पुरावे चित्रा वाघ यांनी पोलिसांना द्यावेत असे आवाहन आज डॉ. गोऱ्हे यांनी केले. याबाबत मी काही भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मदतीच्या नावाने एखाद्या पिडीतेचा वापर राजकीय हेतूने करणे अत्यंत अयोग्य आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी काही बंधने पाळणे आवश्यक आहे. अन्यथा त्या स्त्रीला अपयशाच्या रस्त्यावर अर्ध्यावर सोडणे असे होईल. पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही होईल याकडे लक्ष देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.