
सामना प्रतिनिधी । लातूर
उदगीर तालूक्यातील वाढवणा विभागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तसेच मच्छीमार समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने हाळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा संपूर्ण पिकांचा पिकविमा मंजूर करुन वाटप करण्यात यावा, वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्त करुन संस्थेची चौकशी करण्यात यावी, स्थानिक मच्छिमारांना व्यावसायीक परवाने देण्यात यावेत, हाडी हंडरगुळी येथील झाडाच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली मोठया झाडांची कत्तल करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, हाळी -हंडरगुळी आणि परिसरातील अवैधधंदे बंद करण्यात यावेत या मागण्यांसाठी हाळी हंडरगुळे येथील शिवाजी चौकात नांदेड – बिदर राज्यमार्गावर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रभारी जिल्हाप्रुमख नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, रामचंद्र अदावळे, तालूकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, विकास जाधव, उपेंद्र कळेगोरे, कृष्णा सुकणे, लक्ष्मण पेठकर, नाना पाटील, विलास बिरादार, शैलेश वडगावे, रमण माने, मनोज पाटील, भानुदास कबनुरे, अंकूश टातपल्ले, कैलास कापसे, पुडलीक जाधव, अजय नागापल्ले, नितीन मोरतळे, शरद कणकुरे, लखन घोणसे, शशिकांत बच्चेवार, प्रदिप शिंदे, अर्जुन अटोळकर, राहूल जगताप, विवेकांनद बिरादार, हरी मोरतळे, शरद पाटील यांच्यासह इतरांचा समावेश होता. तहसीलदारांच्या प्रतिनिधींना यावेळी निवेदन देण्यात आले.






























































