ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुंबईकरांची लूटच, शिवसेनेची मिंधे सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात आले होते. त्या प्रकल्पांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेनेने मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईकरांची तिरोजी कोण खाली करतंय असा संतप्त सवाल करत शिवसेनेने राज्य सरकारला खर्चात माहिती मुंबईरकरांसमोर आणण्याची मागणी केली आहे.

”मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मविआ सरकार काळात आम्ही सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत होतो. घटनाबाह्य सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत सुरु असलेल्या प्रकल्पांवर वारेमाप खर्च करण्याचे प्रकार घडतच आहेत. ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुंबईकरांची लूटच आहे. याबाबत आम्ही आवाज उठवला. पण ही लूट अजूनही थांबत नाही. त्यासाठी प्रकल्पांवर होत असलेल्या खर्चाची माहिती मुंबईकरांसमोर आलीच पाहिजे” अशी टीका शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे.