
शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रकल्पाच्या 400 कोटी रुपयांच्या खर्चास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिकाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येईल. पहिल्या टप्प्यात इमारतीचे बांधकाम होईल. त्यात विद्युत तसेच वातानुकूलित यंत्रणा, स्मारकाच्या इमारतीची अंतर्गत व बाह्य सजावट, काहनतळ उभारणी, बगिचा, रेनकॉटर हार्वेस्टिंग व इतर कामांचा समावेश आहे.
या कामासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱया टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन्ही टप्प्यांतील कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.
या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱया 400 कोटी रुपयांचा खर्च प्रारंभी मुंबई महानगर प्रदेश किकास प्राधिकरण करणार आहे.































































