शिवभोजन 14 जूनपर्यंत मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीबांचा आधार ठरलेली शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.

राज्यात दिनांक 15 एप्रिल 21 पासून शिवभोजन योजनेंतर्गत निःशुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळय़ांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेंतर्गत एकूण 950 केंद्र सुरू आहेत.