आजपासून शिवडी महोत्सव, भगवा चषक 2023 अंतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी, रामटेकडी येथील बाल विकास मित्र मंडळाच्या वतीने हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन उद्या, 19 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे.

बाल विकास मित्र मंडळाचे यंदाचे 50 वे म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यंदाच्या शिवडी महोत्सवामध्ये ‘कला, क्रीडा आणि सांस्कृतिक’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळय़ाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत, गटनेते, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, विधानसभा संघटक सुधीर साळवी, महिला संघटक लता रहाटे, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, उपविभाग संघटक श्वेता राणे, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, जयसिंग भोसले, शाखा संघटक शुभदा पाटील, अनुराधा इनामदार उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवांतर्गत 19 ते 23 जानेवारीदरम्यान मुंबई शहर ब गट कबड्डी स्पर्धा,  24 जानेवारीला कीर्तनकार  ह.भ.प.संगीताताई येनपुरे-चोपडे यांचा कीर्तन सोहळा, 25 व 27 जानेवारीला खुल्या गटासाठी करा ओके गायन स्पर्धा, 26 जानेवारीला बाल मेळावा, 28 जानेवारीला महिलांसाठी खास कार्यक्रम-खेळ पैठणीचा व हळदीपुंकू आणि 29 जानेवारीला समारोप कार्यक्रमांतर्गत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाकलाविष्कार होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होतील.

महोत्सवाचे आयोजन शिवसेना माजी नगरसेवक सचिन पडवळ, संयोजक सल्लागार प्रकाश माने, मंडळाचे अध्यक्ष मुपुंद परब, सरचिटणीस विकास मोरे, खजिनदार महेश पवार यांनी केले आहे.