
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
सिडकोतील डेटा सर्व्हिसेस कन्सलटिंग इंजिनियर्सचे श्रीहरी चौधरी व त्याचा साथीदारांनी थकीत वेतनासाठी कार्यालयप्रमुख आणि शिवसेनेचे गटनेते संतोष फुलपगार यांचा खून करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची लेखी तक्रार मयताची आई पद्मिनी वसंतराव फुलपगार यांनी सिडको पोलिसांकडे केली आहे. या घटनेला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
सिडको एन-६ संभाजी कॉलनीतील संतोष फुलपगार हे संभाजी कॉलनी शिवसेनेचे गटनेता होते तसेच ते काही वर्षांपासून श्रीहरी चौधरी यांच्या डेटा सव्र्हिसेस कन्सलटिंग इंजिनियर्स या कार्यालयात कार्यालयप्रमुख होते. थकीत पगार, विमा आणि भविष्यनिर्वाह निधीवरुन संतोष यांचे मालक चौधरीसोबत वाद सुरू होते. यावादावरून श्रीहरी चौधरी व त्याच्या साथीदारांनी एका रिक्षाने संतोषचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच संतोषचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत रिक्षाचालकास पकडून ठेवले होते, त्यानंतर चौधरी यांचे बिंग फुटले. १७ आणि १८ जून रोजी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यास सत्यता समोर येईल.
माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेले श्रीहरी चौधरी, अब्दुल्ला व त्याच्या तीन कर्मचाNयांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार मयताची आई पद्मिनी फुलपगार यांनी सिडको पोलिसांकडे दिली आहे.































































