
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर करण्याचा राज्य शासनाचा आदेश असताना मुंबईचा विकास आराखडा जाणीवपूर्वक इंग्रजीतून जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने या ‘इंग्रजी’ विकास आराखडय़ाची ‘होळी’ केली. सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला साकीनाका येथे हे आंदोलन करण्यात आले. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱयांकर शिस्तभंगाची क दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


























































