शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा रात्री 12 च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला. या अपघातात मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र 9 जानेवारी ला संभाजीनगरला गेले होते. परत येताना जालना शहरातील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचे (क्रमांक एमएच 28 बीके 2777) टायर फूटून तीने रस्त्याच्या खाली 3 ते 4 पलटी घेत सरळ झाली.

या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.

सुदैवाने आमदार संजय रायमुलकर काल मेहकर येथे होते. तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आमदार संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.