
शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करावेच लागेल अशी भूमिका घेणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. विनायक राऊत माध्यमांशी सवांद साधताना म्हणाले की, सत्तेत असताना शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, कृषिपंपाचं बिल वसूल करू नका असे कोकलणारे देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही. अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी अत्यंत संतप्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपाची रंग बदलणारी राजकीय औलाद आहे. अशी सडेतोड टीका खासदार विनायक राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.
शेतकरी वीजबिलाच्या मुद्द्यावरून विनायक राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात असताना घेतलेली भूमिका सत्तेत आल्यावर बदलली त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.

























































