
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिह्याकरिता खालील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख- राजेंद्र गायकवाड (यवतमाळ जिल्हा), जिल्हा समन्वयक- श्रीकांत मुनगीनवार (यवतमाळ जिल्हा), जिल्हाप्रमुख- प्रवीण शिंदे (दिग्रस, आर्णी, उमरखेड), विश्वास नांदेकर (वणी, राळेगाव), संतोष ढवळे (यवतमाळ, पुसद), उपजिल्हाप्रमुख- रवी ऊर्फ श्रीकांत राठोड (आर्णी विधानसभा), प्रसिद्धीप्रमुख- प्रशिल ढोके (आर्णी विधानसभा), तालुकाप्रमुख- उज्ज्वल मोरे (आर्णी तालुका), तालुका संघटक- धनराज राठोड (आर्णी तालुका), शहरप्रमुख- राजेंद्र ठाकरे (उमरखेड शहर).




























































