
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानची युवा नेमबाज मनू भाकरने झेक प्रजासत्ताकात पार पडलेल्या मीटिंग ऑफ शूटिंग होप्स नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आपले नववे सुवर्णपदक पटकावले. मनूने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. १६ व्या वर्षात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत मनूने याच प्रकाराचे सुवर्णपदक पटकावले होते.
२०१८ च्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत हिंदुस्थानची सर्वात युवा नेमबाज म्हणून मनू सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने २ सुवर्णपदकांची कमाई केली होती.




























































