लष्कराच्या सहा जवानांना कीर्तीचक्र, 15 जणांना शौर्यचक्र

सैन्यदलात अतुलनीय शौर्य दाखवणाऱया सहा जवानांना कीर्तीचक्र (चार मरणोत्तर) आणि 15 जवानांना शौर्यचक्र (दोघे मरणोत्तर) जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सेना मेडल (शौर्य), नौसेना पदक (शौर्य) वायुसेना पदके (शौर्य), परम विशिष्ट सेवा पदके, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदके, युद्ध सेवा पदक, सेना पदक (कर्तव्य निष्ठा) विशिष्ट सेवा पदक असे मिळून 412 शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

कीर्तीचक्र

मेजर शुभांग (डोग्रा रेजिमेंट, 62 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स), नायक जितेंद्र सिंह (रजपूत रेजिमेंट, 44 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स), जम्मू आणि कश्मीर पोलीस कॉन्स्टेबल रोहितकुमार (मरणोत्तर), उपनिरीक्षक दीपक भारद्वाज (मरणोत्तर), हेड कॉन्स्टेबल सोधी नारायण (मरणोत्तर), हेड कॉन्स्टेबल श्रावण कश्यप (मरणोत्तर)

शौर्यचक्र

मेजर आदित्य भदौरिया, पॅप्टन अरुणकुमार, पॅप्टन युद्धवीरसिंह, पॅप्टन राकेश टी. आर, नायक जसबीरसिंग, लान्स नायक विकास चौधरी, कॉन्स्टेबल मुदस्सर शेख, फ्लाईंग पायलट ग्रुप पॅप्टन योगेश्वर कृष्णराव कंदाळकर, फ्लाईट लेफ्टनंट तेज पाल, स्क्वॉड्रन लीडर संदीपकुमार झाझरिया, इंडियन एअर पर्ह्स आनंद सिंह, एअर फोर्स सुरक्षा सुनील कुमार, असिस्टंट कमांडंट सत्येंद्रसिंह, डेप्यु. कमांडंट विक्कीकुमार पांडे, कॉन्स्टेबल विजय ओराओन.

महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा गौरव

आर्मीच्या पदकांमध्ये काही मराठी जवानांचा समावेश आहे. सांगली जिह्यातील शिराळा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र शहीद जवान रोमित चव्हाण यांना मरणोत्तर सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत जवान रोमित यांना वीरमरण आले होते. याशिवाय लेफ्टनंट जनरल मिलिंद भुर्पे (सेवानिवृत्त), मेजर जनरल रवी पाटील, मेजर जनरल अभिजित पेंढारकर, मेजर सुजय घोरपडे, मेजर प्रथमेश प्रदीप जोशी, मेजर जनरल उल्हास किरपेकर, ब्रिगेडियर शिरीन देशपांडे, सौरभ शिंदे, कर्नल अतुल चौधरी, ब्रिगेडियर अजित महेंद्र येवले (मराठा लाइट इन्फंट्री), ब्रिगेडियर मनोज जोशी, मेजर जनरल नितीन इंदूरकर, मेजर जनरल रंजन महाजन, मेजर जनरल राजेंद्र जोशी, कर्नल संदीप अरविंद पेंडसे, लेफ्टनंट कर्नल रेणुका हरणे, कर्नल सचिन महाडिक, कर्नल दीपक पलांडे, कमांडर प्रशांत शिधये यांचाही विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे.