
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव…! कामगारांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो..! कामगार एकजुटीचा विजय असो…! मानधन नको वेतन हवे आदि विविध घोषणा देत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (सीटू) सलग्न असणाऱ्या आशा वर्कस, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांनी दोन दिवसांच्या संपावर जात ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर समोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल 15 मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आशा वर्कस, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधूनही शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत. उलट सरकार कामगार विरोधी धोरण अवलंबून कामगार कायदा मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र याला विरोध करण्यासाठी भारतीय सर्व कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने ८ व ९ जानेवारी या दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियनशी (सीटू) सलग्न असणाऱ्या आशा वर्कस, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्सचे राज्य पदाधिकारी कॉ. ए. बी. पाटिल, कॉ. सुभाष निकम, कॉ. विजयाराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियनशी (सीटू) सलग्न असणाऱ्या आशा वर्कस, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांनी आज ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे महामार्गावर मनुष्य साखळी तयार करून महामार्ग रोखला. तसेच आपल्या विविध मागण्यांकडे शासनांचे लक्ष वेधन्यासाठी विविध गगणभेदी घोषणा दिल्या.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियनशी (सीटू) सलग्न असणाऱ्या आशा वर्कस, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांनी आज ओरोस येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर मनुष्य साखळी आणि ठिय्या माण्डुन या कर्मचाऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. तब्बल 15 मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच्या लांब वाहनांची रांगा लागल्या होत्या. दरम्यान या कर्मचाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.
आशा वर्कस, गटप्रर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच वैद्यकीय प्रतिनिधी यांनी आपल्या मागण्यांसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर रास्ता रोको करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सम्बंधित शेकडो कर्मचाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. समज देत त्यांची सुटका करण्यात आली.
गगनभेदी घोषणांनी महामार्ग दणाणला.
या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, कामगारांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, कामगार एकजुटीचा विजय असो, मानधन नको वेतन हवे, शासकीय सेवेत सामावून घेतलेच पाहिजे, कोण म्हणतय देणार नाय घेतल्या शिवाय जाणार नाय आदि विविध गगनभेदी घोषणा देत या कर्मचाऱ्यांनी महामार्ग परिसर दणाणुन सोडला.
या आहेत प्रमुख मागण्या…
जीवनावश्यक वस्तुंच्या सट्टाबाजारावर बंदी घाला, महागाई नियंत्रणात आणा, किमान वेतनाची हमी दया, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, शेतकरी शेतमजूर यांना पेंशन लागू करा, कंत्राटीकरण बंद करा यासह एकूण 12 मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले.




























































