
गायक, संगीतकार आणि उद्योजक जशन भूमकर यांनी ‘मदर्स डे’चे औचित्य साधून ‘ती एकटी चांदणी’ गाणे प्रदर्शित केले आहे. भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असे गाणे मुलांना त्यांच्या आईबद्दल वाटणाऱया प्रेमाला मूर्त रूप देते. विश्वव्यापी तारांगणात आई ही मुलांसाठी एकमेव चमकणारा तारा आहे, अशी सुंदर भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे.
गाण्याविषयी जशन भूमकर म्हणाले, मला आई प्रियंवदा भूमकर यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. ज्यांनी एक उद्योजक आणि आई अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. तिच्याकडे बघून खूप काही शिकता आलं. तिच्याप्रती प्रेम आणि कृतज्ञता या गीतातून मी व्यक्त केली आहे.


























































