
बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झालेली असताना ती अनेक लोकांना भेटली होती. त्यात नेते, खासदार आणि मंत्र्यांचाही समावेश होता. कनिका ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होती त्यापैकी 28 जणांच्ची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील 14 दिवस तरी लोकांनी विलग राहणे गरजेचे आहे.
उत्तर प्रदेशच्या किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात 45 नमुने निगेटिव्ह निघाल्या आहेत. त्यापैकी 28 व्यक्तींचे नमुने हे कनिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे होते. इतर 17 नमूने हे आग्रा, फिरोजाबाद, अयोध्या आणि शहाजानपूरचे होते. ज्यांचे रीपोर्ट जरी निगेटिव्ह आले असले तरी त्यांना विलग राहण्याच्चे आदेश देण्यात आले आहेत. 14 दिवसांत कधीही कोरोनाचे लक्षणे दिसू शकतात. म्हणून आरोग्य विभागाने सर्वांना विलग राहण्यास सांगितले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्र्यांचे रीपोर्ट निगेटिव्ह
उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री प्रताप सिंह यांची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या पत्नीचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी सिंह यांच्या सर्व कुटुबीयांना विलग राहण्यास सांगितले आहे.
























































