कामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला

snake-lands-on-woman-head-as-she-opens-door-of-her-house-in-mississippi

दरवाजा उघडून आत शिरताना अचानक साप अंगावर पडल्यावर आपली काय स्थिती होईल याचा विचार केला तरी काटा येतो. पण असाच एक अनुभव एका महिलेला आला आहे. कामावरून घरी परतल्यावर दरवाजा उघडून आत शिरल्यावर महिलेच्या अंगावर साप पडला आणि तिची भंबेरी उडाली.

अमेरिकेतील मिसीसिपी येथील ही घटना घडली आहे. एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार क्रिश्चियन मिशेल मागल्या आठवड्यात कामावरून घरी परतली. घराचा दरवाजा उघडल्यावर तिच्या डोक्यावरच साप पडला. पहिले तिला काही कळलेच नाही. आपल्या अंगावर नक्की काय पडले होते म्हणून काही पाहिले तर साप सरपटत गेला. जवळपास 10 इंच लांब साप होता. साप बघून ती स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली. मिशेलने आपल्या पतीला कळवले. नंतर थोडे धाडस दाखवत तिने झाडूने त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सापाने झाडूला दंश केला. अर्थात हा साप विषारी नसल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या