दारुच्या नशेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी, धड चालताही येत नव्हतं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याने नुकतीच एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीची चांगलीच चर्चा होती. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा सजदेहची. सीमा पार्टीतून बाहेर पडली ती दारूच्या नशेत तर्राट होऊन. तिला धड चालताही येत नव्हतं. त्या अवस्थेतील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

करणनं 25 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडमधील काही जवळच्या मित्र मैत्रिणींसाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी सीमा स्टायलिश लुकमध्ये पोहोचली होती. पार्टी संपल्यानंतर बाहेर पडताना सीमानं तिथं असलेल्या फोटोग्राफर्ससांठी पोझ दिल्या. पण पोज देतानाही तिला उभंही राहता येत नव्हतं, तिचा तोल जात होता.