सोलापुरात सराईत आंतरजिल्हा दुचाकीचोराला अटक; 11 दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरसह धाराशिव, सांगली, नगर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

नामदेव बबन चुनाडे (रा. अनिलनगर, पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोलापूर शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. गुह्याच्या तपासादरम्यान चोरीतील मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन आलेल्या नामदेव चुनाडे याला कर्णिकनगरजवळ पोलिसांनी पकडले.

अधिक चौकशीत चुनाडे याने सोलापूर, धाराशिव, पिंपरी-चिंचवडनगर, पुणे, सांगली आदी भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.