चित्रपटातील मुख्य भूमिकेवरून सोनाक्षी व परिणितीमध्ये जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील अभिनेत्रींमधील शीतयुद्ध हे काही नवीन नाही. एकाच चित्रपटात काम करताना अनेक अभिनेत्रींमध्ये भांडणं झाली आहेत. असेच काहीसे शीतयुद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यात सुरू आहे. परिणीती व सोनाक्षी यांच्या आगामी चित्रपटातील मुख्य भूमिकेवरून त्यांच्यात वाद सुरू झाला असून दोघीही सतत प्रोडक्शन टीमकडे तक्रारी करत असतात असे समजते.

सोनाक्षी व परिणीती हे अजय देवगणसोबत एक चित्रपट करत आहेत. या चित्रपटाचे अद्याप नाव निश्चित झालेले नाही. या चित्रपटाच्या सेटवर एकदा सोनाक्षीने मी या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असल्याचे काही जणांना सांगितले. ती गोष्ट परिणीतीच्या कानावर पोहचली व ती संतापली. तिने याबाबत निर्मात्यांकडे तक्रार केली. त्यानंतर या दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झाले असून त्या दोघी सीन व्यतिरिक्त एकमेकीच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाही. संवादांव्यतिरिक्त त्या एकमेकींशी बोलत देखील नसल्याचे समजते.