
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या आणि सोनिया गांधी यांची भेट घेणाऱ्या काही काँग्रेस नेत्यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले आहे.
सोनिया गांधी यांना बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला होता. त्यांतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज मिळाला असून तो पॉझिटिव्ह आल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी स्वत:ला सध्या आयसोलेट करुन घेतले असून आपल्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून दोन-तीन दिवसात बऱ्या होतील असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे.
Congress president Sonia Gandhi tests positive for COVID-19. She has developed mild fever & some symptoms & has isolated herself and has been given requisite medical attention. As of today, her date of appearance before ED on June 8th stands as it is: Congress’ Randeep Surjewala pic.twitter.com/0eTTN1RhUn
— ANI (@ANI) June 2, 2022
ईडीचे समन्स
ईडीने बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना समन्स बजावले. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात राहुल यांना 2 जूनला व सोनिया यांना 8 जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. 2015 मध्ये बंद झालेल्या जुन्या खटल्याची फाईल पुन्हा उघडून ईडीने दोघांना समन्स धाडले आहे. चौकशी सुरू होण्यापूर्वीच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून 8 जूनपूर्वी त्या बऱ्या होतील, असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे.






















































