
सामना प्रतिनिधी, पेण
पहिल्याच पावसात पेण तालुक्यातील सोनखार येथील नुकताच तयार करण्यात आलेला रस्ता खचला आहे. यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जासंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत बनविण्यात आलेल्या रस्त्याची अभियंत्यानी व्यवस्थित तपासणी न करता तक्रारदार व अधिकारी यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे शासनाच्या लाखो रूपये खड्ड्यात गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सदर रस्त्याची ताबडतोब डागडुजी करण्यात यावी व पावसाळ्यानंतर सदर रस्ता पुन्हा बनवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.































































