‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार ‘सूर्यवंशी’, व्हिडीओ शेअर करत अक्षयने दिली माहिती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ अखेर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सिंघम, सिम्बानंतर आता पोलिसांच्या आयुष्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन आला आहे. हा चित्रपट पूर्णपणे बनून तयार आहे, मात्र प्रत्येक वेळी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे केली जात होती. मात्र आता अक्षय कुमारने सांगितले आहे की, हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. ही माहिती देत अक्षयने एक व्हिडीओही शेअर केला आहे.

या चित्रपटाबद्दल माहिती देताना व्हिडीओ शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्ही वचन दिल्या प्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत, आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात 30 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’

रोहित शेट्टीच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच जॅकी श्रॉफ, अजय देवगन आणि रणवीर सिंग हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मागील वर्षी यूट्यूबवर रिलीज झालेला या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.