
सामना ऑनलाईन । केप टाऊन
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंनी एकमेकींसोबत विवाह केला आहे. या दोघींच्या लग्नाला त्यांचा संपूर्ण संघ उपस्थित होता. सर्वांनी दोघींच्या संसाराला शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघींनीही सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वैन निकेर्क हीने तिच्या संघातील मैरीजान कॅपीसोबत लग्न केले आहे. मैरीजाना ही संघातील जलद गोलंदाज आहे. या दोघी गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या महिलांच्या संघात खेळत आहे. एकत्र खेळता खेळता त्या दोघी एकमेकिंच्या प्रेमात पडल्या. नुकताच दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतला असून मायदेशी परततााच या दोघींनी लग्नाचा बार उडवून दिला आहे.




























































