
शिरूर आनंतपाळ तालुक्यातील साकोळ व परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड चांगल्या प्रकारे केलेली आहे. सध्या पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे सोयाबीन काढणीस वेग आला आहे.
साकोळ व परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यात व्यस्त झालेला आहे.यावर्षी चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केलेली होती.त्यानंतर सोयाबीन पीक चांगले उगवले व उगवलेल्या पिकांची शंखिगोगलगायनी मोठ्या प्रमाणात पिकांची देठी कुडतडून टाकले.यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.त्यातूनही काही प्रमाणात आलेल्या सोयाबीन पिकांवर हरणांच्या कळपांनी मोठ्या प्रमाणात नासधूस करून खाऊन टाकले होते.या सर्व अडचणीतून जे काही सोयाबीनचे पीक आलेले होते ते पीक तरी हाताला लागेल की नाही असे वाटत होते.कारण सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली दिसत होती त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला दिसून येत होता.सध्या सोयाबीनचे जे काही पीक काढणीला आलेल्या आहे ते काढण्यासाठी मजूर देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.आपल्या हाता तोंडाशी आलेला घास काढण्यासाठी मजुरांना मागितले तेवढे पैसे देण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही.
सध्या मिळेल त्या गावातून मजूर आणण्यासाठी शेतकऱ्यांपुढे चढाओढ लागलेली दिसत असून तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे व वातावरण स्वच्छ असल्यामुळे ऊन देखील चांगल्या प्रकारे पडत आहे.यामुळे आपल्या शेतातील सोयाबीनची काढणी लवकर करून त्याच्या बनवी लावण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चाललेली आहे.

























































