राजामौलींच्या ‘महाभारत’मध्ये झळकणार सगळं बॉलिवूड? पाहा व्हिडीओ

2953

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित महाभारत या आगामी चित्रपट कसा असेल याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका व्हिडीओतून दिसत आहे. युनिव्हर्सल फॉक्स स्टुडिओने हा व्हिडीओ प्रदर्शित केला असून यात काम करणाऱ्या कलाकारांची मांदियाळी पाहता सगळं बॉलिवूडच या चित्रपटात झळकणार असल्याचं दिसून येत आहे.

या चित्रपटात आमीर खान कृष्णाची भूमिका करणार असून, अमिताभ बच्चन- भीष्म, अजय देवगण- दुर्योधन, अभिषेक बच्चन- दुश्शासन, हृतिक रोशन- कर्ण, प्रभास- भीम, विद्युत जामवाल – नकुल, रणवीर सिंग- सहदेव, ऐश्वर्या राय- गंगा, विद्या बालन – मत्स्यगंधा सत्यवती, रेखा – कुंती, दीपिका पदुकोण – द्रौपदी, रजनीकांत- धृतराष्ट्र, कमल हासन- शंतनु, फरहान अख्तर- अर्जुन असे तगडे कलाकार झळकणार आहेत. अजूनही युधिष्ठिर, शकुनी, गांधारी, विदुर अशा अनेक व्यक्तिरेखा उलगडण्यात आलेल्या नाहीत.

हा चित्रपट एस एस राजामौली हे दिग्दर्शित करत असल्याचं दिसत आहे. बाहुबलीच्या सुपरडुपर यशामुळे चर्चेत आलेले राजामौली यावेळीही पडद्यावर धमाका करण्याच्या बेतात दिसत आहेत. एकंदरच स्टारकास्ट बघता सगळे बॉलिवूडच या चित्रपटा झळकणार असं दिसत आहे. सध्यातरी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी हा व्हिडीओ तुफान गाजतोय.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या