परळी तालुक्याचा निकाल 13.51 टक्क्यांनी घटला, यंदाचा निकाल 76.34 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परळी वैजनाथ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (10 वी ) च्या परीक्षेत परळी तालुक्यातील निकालाची सरासरी 76.34 टक्के इतकी आहे.दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि.08 जून दुपारी एक वाजता जाहीर झाला. या मध्ये परळी तालुक्यातील विविध विद्यालयातून परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपापला निकाल कळला. तालुक्यात दहावी साठी 4419 परीक्षार्थींची नोंद झाली होती.त्यापैकी 4341 परीक्षार्थीं परिक्षेत प्रविष्ट झाले होते. या मध्ये 3314 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परळी तालुक्याची निकालाची टक्केवारी सरासरी 76.34 टक्के इतकी आहे. तर तालुक्यातील विशेष प्रावीण्य घेऊन उत्तीर्ण होणारांची संख्या 822 एवढी आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1530, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 910 तर पास श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 52 इतकी आहे.तर भेल सेकंडरी स्कूल,अनुसूचित मुलीची निवासी शाळा अशा तालुक्यातील 100 टक्के निकाल असणाऱ्या दोन शाळा आहेत.यावेळी तालुक्यातील फक्त 9 शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त इतका आहे.