नगरमध्ये एस.टी.च्या सहाय्यक वाहतूक अधिक्षकाला कार्यालयात घुसून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

निलंबन झाल्याच्या रागातून सहाय्यक वाहतूक निरीक्षकाच्या कार्यालयात जाऊन मारहाण करून त्यांना ढकलून देण्याची घटना गुरूवारी दुपारी 4.30 वाजता तारकपूर बस डेपो येथे घडली. सहाय्यक वाहतूक निरीक्षक स्वप्निल नानाजी आहेर (वय 26, रा. शिवनेरी एस टी क्वॉर्टर्स, सर्जेपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण निलंबित झालो, असा समज दशरथ तुकाराम होळकर (रा. नेप्ती) याला झाल्याने त्याचा राग मनात धरून होळकर याने आहेर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करून ढकलून दिले. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वप्नील आहेर यांच्या फिर्यादीवरून भादंविक 353, 332 प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुलानी करीत आहेत.