
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच राज्याच्या मराठी भाषिक जनतेच्या हितासह, महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्र राज्य कायमच सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा ठराव नागपूरमध्ये होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर या काळात नागपूरमध्ये होणार आहे. विधानभवनात विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ठरावाला सर्वांची संमती
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कर्नाटक राज्यातील सीमावासीय भागात राहणाऱया मराठी भाषिक जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी महाराष्ट्र सरकार कायमच पाठीशी असल्याचा ठराव या अधिवेशनात संमत केला जाईल. याबाबतची सूचना डॉ. नीलम गोऱहे यांनी या बैठकीत केली. यावर सर्वांनीच संमती दर्शवली.

































































