
राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर वसंतदादा इन्स्टिटयूट झुम मिटींगमध्ये करण्याचे निश्चित झाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिटयूटने 23 एप्रिल रोजी झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते.
सध्या कोविडच्या दुसऱया लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठय़ा प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे. बैठकीवेळी व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या.
कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हावेतील वायुद्वारे ऑक्सिजनची निर्मीती मोठय़ा प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी पटवून सांगितले आणि या मिटींगमध्ये तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
धाराशिव साखर कारखाना प्रति दिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सिजन तुटवडय़ावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत.
धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणाऱया परवानगी जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिटयूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.

























































