सरदार पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो, मग राममंदिरासाठी कायदा का नाही- संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rss-dattatreya-hosabale

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो तर अयोध्येत राममंदिरासाठी कायदा का मंजूर होऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटनांनी रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामंदिराच्या प्रश्नावरून खडे बोल सुनावले.

रामजन्मभूमीवर जिथे वादग्रस्त वास्तू उभारण्यात आली त्या जागेच्या उत्खननामध्ये मंदिराचे पुरातत्वीय अवशेष सापडल्याचे अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट झाले आहेत. असे असताना देखील मंदिर निर्माणासाठी एवढा वेळ लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालय अयोध्येतील जमीनीच्या मालकी हक्कांसदर्भात सुनावणी करत आहे. मात्र अद्याप त्यावर निर्ण झालेला, नाही असेही ते म्हणाले.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नंदकुमार हे देखील राममंदिराच्या प्रश्नावर बोलले. राममंदिर ही केवळ संघाची मागणी नाही तर हिंदुस्थानची आवश्यकता आहे. कोट्यवधी लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे, मग संघ असो वा नसो राममंदिर बनलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.