‘स्त्री 2’ सिनेमा 500 कोटींच्या घरात, सिनेमाच्या नावावर झाला हा रेकॉर्ड

‘स्त्री 2’ या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर कायम असून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमालीचा रेकॉर्ड केला आहे. श्रद्धा कपूरचा सिनेमा ‘स्त्री 2’ दरदिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. या सिनेमाने दमदार कलेक्शन करुन 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश घेतला आहे, सोबत श्रद्धा कपूरच्या नावावरही एक नवा रेकॉर्ड दाखल झाला आहे.

‘स्त्री 2’ चे प्रोडक्शन हाऊस मेडॉक सिनेमाने लेटेस्ट वर्ल्डवाइड कलेक्शन शेअर केले आहे. शिवाय ‘स्त्री 2’ ने 10 दिवसात 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या हॉरर-कॉमेडी सिनेमाने जवळपास 505 कोटी रुपयांचा वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. जगभरातून 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारी ‘स्त्री 2’ दुसरा हिंदुस्थानी सिनेमा बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होऊन स्त्री 2 ने इतिहास रचला आहे. या शानदार कलेक्शनसोबत श्रद्धा कपूरने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. 500 कोटी क्लबचा हिस्सा बनलेली स्त्री 2 ही दुसरी महिला लिडींग सिनेमा आहे,

आम्ही तुम्हाला सांगूया की ‘स्त्री 2’ ने दुसऱ्या शनिवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने 33.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे कोणत्याही चित्रपटाचे सर्वाधिक दुसऱ्या शनिवारचे कलेक्शन आहे. ‘स्त्री 2’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 361 कोटींची कमाई केली आहे.