
सामना ऑनलाईन। प्रिटोरिया
क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळात चेंडू कुरतडण्याचे (बॉल टॅम्परिंग ) वाईट प्रकार वाढत चाललेले आहेत. बॉल टॅम्परिंग ही खेळातली विकृती असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) कठोर शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने केली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार स्टिव्हन स्मिथ ,डेविड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्राफ्ट यांच्यापाठोपाठ श्रीलंकन कर्णधार दिनेश चंडिमल बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणात फसला आहे, आता चेंडू कुरतडण्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची मागणी करणारा डुप्लेसिसहि यापूर्वी २०१३ मध्ये संयुक्त अरब आमिरातीत आणि २०१६ला ऑस्ट्रेलियात बॉल टॅम्परिंगच्या आरोपांत फसला होता.आता तो म्हणतो ,आयसीसीचे नियम कडक असले तरी गेल्या काही वर्षांत बॉल टॅम्परिंगच्या घटनांत वाढ झाली आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता तातडीने कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे.


























































