मुस्लिम टोपी घातल्याप्रकरणी विद्यार्थ्याला मारहाण; पोलीस उपनिरीक्षकासह पाचजणांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या बागलकोट जिह्यातील तेरादल फस्ट ग्रेड सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी मुस्लिमी टोपी घालून वर्गात आला होता. याप्रकरणी प्राचार्यांनी त्याला वर्गात प्रवेश नाकारत पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हा एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याला मारहाण केल्याची घटना फेब्रुवारीमध्ये घडली होती.

याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकासह महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुस्लिम टोपी घालून महाविद्यालयात येऊ नये, असा कोणताही सरकारचा निर्णय नाही. त्यामुळे सदरच्या विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश नाकारणे आणि मारहाण करणे बेकायदेशीर असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.